YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 16:21-24

मत्तय 16:21-24 MARVBSI

तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की, “मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे व तिसर्‍या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे.” तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, “प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.” परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.” मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.