त्या वेळी मांडलिक हेरोदाने येशूची कीर्ती ऐकली, आणि आपल्या सेवकांना म्हटले, “हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे; हा मेलेल्यातून उठवण्यात आला आहे म्हणून ह्याच्या ठायी अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य कार्य करत आहे.” कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून व बांधून कैदेत टाकले होते; कारण योहानाने त्याला म्हटले होते की, “तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही.” आणि तो त्याला जिवे मारण्यास पाहत असूनही लोकांना भीत होता, कारण ते त्याला संदेष्टा मानत असत. नंतर हेरोदाचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले. त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की, “जे काही तू मागशील ते मी तुला देईन.” मग तिच्या आईने तिला पढवल्याप्रमाणे ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शीर तबकात घालून मला येथे आणून द्या.” तेव्हा राजाला वाईट वाटले; तरी आपल्या शपथांमुळे व जे पंक्तीस बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते देण्याची आज्ञा केली; आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानाचा शिरच्छेद करवला. मग त्याचे शीर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आईजवळ नेले. नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले.
मत्तय 14 वाचा
ऐका मत्तय 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 14:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ