आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे; ते भरल्यावर माणसांनी ते किनार्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यांत जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” ते त्याला म्हणाले, “होय प्रभूजी.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्याजुन्या गोष्टी काढणार्या गृहस्थासारखा आहे.” नंतर असे झाले की, हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला. आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून? हा सुताराचा पुत्र ना? ह्याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन व यहूदा, हे ह्याचे भाऊ ना? ह्याच्या बहिणी, त्या सर्व आपल्याबरोबर नाहीत काय? मग हे सर्व ह्याला कोठून?” असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यांना म्हटले, “संदेष्ट्याला आपला देश व आपले घर ह्यांत मात्र सन्मान मिळत नाही.” तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत.
मत्तय 13 वाचा
ऐका मत्तय 13
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 13:47-58
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ