अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, त्याची वंशावळी. अब्राहामाला इसहाक झाला; इसहाकाला याकोब; याकोबाला यहूदा व त्याचे भाऊ झाले; यहूदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले; पेरेसाला हेस्रोम झाला; हेस्रोमाला अराम झाला; अरामाला अम्मीनादाब; अम्मीनादाबाला नहशोन; नहशोनाला सल्मोन; सल्मोनाला राहाबेपासून बवाज; बवाजाला रूथपासून ओबेद; ओबेदाला इशाय; आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरीयाची बायको होती तिच्यापासून दाविदाला शलमोन झाला; शलमोनाला रहबाम; रहबामाला अबीया; अबीयाला आसा; आसाला यहोशाफाट; यहोशाफाटाला योराम; योरामाला उज्जीया; उज्जीयाला योथाम; योथामाला आहाज; आहाजाला हिज्कीया; हिज्कीयाला मनश्शे; मनश्शेला आमोन; आमोनाला योशीया; आणि बाबेलास देशांतर झाले त्या वेळी योशीयाला यखन्या व त्याचे भाऊ झाले. बाबेलास देशांतर झाल्यावर यखन्याला शल्तीएल झाला. शल्तीएलाला जरूब्बाबेल; जरूब्बाबेलाला अबीहूद; अबीहूदाला एल्याकीम; एल्याकीमाला अज्जुर; अज्जुराला सादोक; सादोकाला याखीम; याखीमाला एलीहूद; एलीहूदाला एलाजार; एलाजाराला मत्तान; मत्तानाला याकोब
मत्तय 1 वाचा
ऐका मत्तय 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 1:1-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ