YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मलाखी 3:8-11

मलाखी 3:8-11 MARVBSI

मनुष्य देवाला ठकवील काय? तुम्ही तर मला ठकवले आहे; असे असून तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे?’ दशमांश व अर्पणे ह्यासंबंधाने. तुम्ही शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही ह्याविषयी माझी प्रचिती पाहा. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणार्‍यास मी तुमच्यासाठी धमकावीन; तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.