ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो.” पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरलात व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात व माझे पाय पाहा; मीच तो आहे; मला चाचपून पाहा; जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते.” असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले. मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्चर्य करत असता त्याने त्यांना म्हटले, “येथे तुमच्याजवळ खाण्यास काही आहे काय?” मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा [व मधाच्या पोळ्याचा काही भाग] दिला. तो घेऊन त्याने त्यांच्यादेखत खाल्ला. मग तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्याबरोबर असताना तुम्हांला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यांत माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे.”
लूक 24 वाचा
ऐका लूक 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 24:36-44
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ