नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी त्याला पिलाताकडे नेले. आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसराला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हांला आढळला.” तेव्हा पिलाताने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” त्याने त्याला उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच.” तेव्हा मुख्य याजकांना व लोकसमुदायांना पिलाताने म्हटले, “मला ह्या मनुष्यात काही दोष आढळत नाही.” तरी ते अधिकच आग्रह धरून म्हणाले, “ह्याने गालीलापासून आरंभ करून येथपर्यंत सार्या यहूदीयात शिक्षण देऊन लोकांना चिथवले आहे.” तेव्हा पिलाताने हे ऐकून “हा मनुष्य गालीली आहे काय?” असे विचारले. आणि तो हेरोदाच्या अंमलातला आहे असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदाकडे पाठवले, कारण तोही त्या दिवसांत यरुशलेमेत होता. येशूला पाहून हेरोदाला फार संतोष झाला; कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे अशी बर्याच दिवसांपासून त्याची इच्छा होती, आणि त्याच्या हातून घडलेला एखादा चमत्कार पाहायला मिळेल अशी त्याला आशा होती. त्याने त्याला बरेच प्रश्न केले; परंतु येशूने काही उत्तर दिले नाही. मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करत होते. आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगझगीत वस्त्रे त्याच्या अंगावर घालून त्याला पिलाताकडे परत पाठवले. त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले; त्यापूर्वी त्यांचे आपसांत वैर होते.
लूक 23 वाचा
ऐका लूक 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 23:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ