मग उजाडल्यावर लोकांचे वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले; आणि ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले, “तू ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.” त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही मुळीच विश्वास धरणार नाही; आणि मी विचारले तरी तुम्ही मला उत्तर देणार [व सोडणारही]नाही. तथापि ह्यापुढे ‘मनुष्याचा पुत्र’ सर्वसमर्थ ‘देवाच्या उजवीकडे बसेल.”’ तेव्हा ते सर्व म्हणाले, “तर तू देवाचा पुत्र आहेस काय?” तो म्हणाला, “तुम्ही म्हणता की मी आहे.” तेव्हा ते म्हणाले, “आपल्याला साक्षीची आणखी काय गरज? आपण स्वतः ह्याच्या तोंडचे ऐकले आहे.”
लूक 22 वाचा
ऐका लूक 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 22:66-71
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ