मग त्यांनी त्याला पकडून चालवले व प्रमुख याजकाच्या घरी नेले; तेव्हा पेत्र दुरून मागे मागे चालू लागला. ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटवून एकत्र बसले होते, त्यांच्यामध्ये पेत्र जाऊन बसला. तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, “हाही त्याच्याबरोबर होता.” पण ते नाकारून तो बोलला, “बाई, मी त्याला ओळखत नाही.” काही वेळाने दुसर्या एकाने त्याला पाहून म्हटले, “तूही त्यांच्यातला आहेस.” पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही.” सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण खातरीपूर्वक म्हणू लागला, “खरोखर हाही त्याच्याबरोबर होता; हा गालीलीच आहे.” पेत्र म्हणाला, “गृहस्था, तू काय बोलतोस ते मला समजत नाही.” असे तो बोलत आहे इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली; आणि ‘आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,’ असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.
लूक 22 वाचा
ऐका लूक 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 22:54-62
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ