मग तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे जैतुनांच्या डोंगराकडे गेला व त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.” मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो दूर गेला; आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली, “हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला. मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता. प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला तेव्हा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले. तो त्यांना म्हणाला, “झोप का घेता? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा.”
लूक 22 वाचा
ऐका लूक 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 22:39-46
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ