YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 20:27-40

लूक 20:27-40 MARVBSI

नंतर, ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणार्‍या सदूक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन त्याला विचारले, “गुरूजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, ‘एखाद्याचा भाऊ’ आपली बायको जिवंत असता ‘निःसंतान असा मेला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’ बरे, सात भाऊ होते; त्यांच्यातील पहिल्या भावाने बायको केली व तो निःसंतान असा मेला. मग दुसर्‍याने ती केली व तो निःसंतान असा मेला. मग तिसर्‍यानेही; ह्याप्रमाणे ते सातही निःसंतान असे मेले; शेवटी ती स्त्रीही मेली. तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या सातांचीही बायको झाली होती.” येशूने त्यांना म्हटले, “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात; परंतु ते युग व मेलेल्यांतून पुनरुत्थान हे प्राप्त करून घेण्यास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत व लग्न करून देणारही नाहीत; आणि ते पुढे मरणारही नाहीत, कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत. पण मोशेनेही झुडपाच्या वृत्तान्तात, परमेश्वराला ‘अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव’ असे म्हणून मेलेले उठवले जातात हे दर्शवले आहे. तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे; कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.” तेव्हा शास्त्र्यांतील कित्येकांनी म्हटले, “गुरूजी, ठीक बोललात.” मग ते त्याला आणखी काहीही विचारण्यास धजले नाहीत.

संबंधित व्हिडिओ