YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 12:49-59

लूक 12:49-59 MARVBSI

मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे; ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते! मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे व तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे. मी पृथ्वीवर शांतता करण्यास आलो आहे असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नाही, तर फूट पाडण्यास; आतापासून एका घरातील पाच जणांत दोघांविरुद्ध तिघे व तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल. मुलाविरुद्ध बाप व ‘बापाविरुद्ध मुलगा,’ मुलीविरुद्ध आई व आईविरुद्ध मुलगी, ‘सुनेविरुद्ध सासू व सासूविरुद्ध सून’ अशी फूट पडेल.” आणखी तो लोकसमुदायांनाही म्हणाला, “जेव्हा तुम्ही ढग पश्‍चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेचच म्हणता, ‘पावसाची सर येत आहे,’ आणि तसे घडते. दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा ‘कडाक्याची उष्णता होईल,’ असे तुम्ही म्हणता आणि तसे घडते. अहो ढोंग्यांनो, तुम्हांला पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही? आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवत नाही? तू आपल्या वाद्याबरोबर अधिकार्‍याकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा यत्न कर; नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल; आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल व शिपाई तुला तुरुंगात घालील. मी तुला सांगतो, अगदी शेवटली टोली फेडीपर्यंत तू तेथून सुटणारच नाहीस.”

संबंधित व्हिडिओ