YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 1:57-66

लूक 1:57-66 MARVBSI

अलीशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी व नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग आठव्या दिवशी असे झाले की, ते बालकाची सुंता करण्यास आले आणि त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखर्‍या ठेवणार होते; परंतु त्याच्या आईने म्हटले, “ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे.” ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगांत कोणी नाही.” मग, “ह्याचे काय नाव ठेवायचे आहे,” असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाटी मागवून ‘ह्याचे नाव योहान आहे,’ असे लिहिले. तेव्हा सर्वांना आश्‍चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करत बोलू लागला. ह्यावरून त्यांच्याभोवती राहणार्‍या सर्वांना त्याचे भय वाटले; आणि यहूदीयाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणार्‍या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवून म्हटले, “हा बालक होणार तरी कोण?” कारण प्रभू त्याच्याबरोबर होता.

लूक 1 वाचा

ऐका लूक 1