मग अहरोनाने लोकांकडे वळून हात उंचावून त्यांना आशीर्वाद दिला आणि जेथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे केली होती तेथून उतरून तो खाली आला. नंतर मोशे व अहरोन दर्शनमंडपात गेले व बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला, तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांच्या दृष्टीस पडले. आणि परमेश्वराच्या समोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.
लेवीय 9 वाचा
ऐका लेवीय 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 9:22-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ