YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 6:1-7

लेवीय 6:1-7 MARVBSI

परमेश्वर मोशेला म्हणाला, “कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले, म्हणजे ठेव किंवा गहाण ह्यांच्या बाबतीत आपल्या शेजार्‍याला फसवले किंवा त्याच्यावर जुलूम केला, किंवा कोणाची हरवलेली वस्तू सापडली असता तिच्याविषयी त्याने लबाडी करून खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यांपैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला, म्हणजे असले पाप करून दोषी झाला तर त्याने लूट करून किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते, किंवा आपल्याजवळची कोणाची ठेव बुडवली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती, किंवा ज्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत त्याने खोटी शपथ वाहिली असेल ती त्याने पुरी भरून द्यावी. ज्या वस्तूचा त्याने अपहार केला असेल तिची पुरी भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन वर आणखी तिचा एक पंचमांश भाग त्याने द्यावा. त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ आपले दोषार्पण आणावे; तू ठरवशील तेवढ्या किंमतीचा कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी त्याने याजकाकडे न्यावा; याजकाने तो घेऊन परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे ज्या कृत्यामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.”