YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 5:14-19

लेवीय 5:14-19 MARVBSI

परमेश्वर मोशेला म्हणाला : “कोणी परमेश्वराच्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या बाबतीत अज्ञानाने विश्वासघात केल्याने पापी ठरला, तर त्याने परमेश्वराला दोषार्पण करण्यासाठी कळपातील एक दोषहीन मेंढा घेऊन यावे; तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा तो असावा; हे शेकेल पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे असावेत; हे दोषार्पण होय. ज्या पवित्र वस्तूच्या बाबतीत त्याने पाप केले असेल तिची भरपाई त्याने करावी, आणि तिच्या मोलाचा आणखी पाचवा हिस्सा तिच्यात घालून ती याजकाला द्यावी; याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल. परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, जरी ते त्याने चुकून केले, तरी तो दोषी ठरेल व त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. त्याने कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी याजकाकडे आणावा; तू ठरवशील तेवढ्या किंमतीचा तो असावा; त्याने अज्ञानाने जी चूक केली असेल तिच्याबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल. हे दोषार्पण होय; परमेश्वरासमोर तो निश्‍चित दोषी आहे.”