ह्याकरता तुम्ही माझे विधी आचरावेत आणि माझे नियम लक्षपूर्वक पाळावेत; असे केल्याने तुम्ही देशात सुरक्षित राहाल. देश आपला उपज देईल, तुम्ही पोटभर खाल आणि त्यात तुम्ही सुरक्षित राहाल. तुम्ही कदाचित म्हणाल, ‘सातव्या वर्षी आम्ही काही पेरायचे नाही व शेताचे उत्पन्न जमा करायचे नाही तर मग आम्ही त्या वर्षी काय खावे?’ पण सहाव्या वर्षी मी तुम्हांला अशी बरकत देईन की जमीन तुम्हांला तीन वर्षांचे उत्पन्न देईल. मग आठव्या वर्षी तुम्ही पेराल आणि जुना साठा खात राहाल; नवव्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल. जमीन विकायची तर ती कायमची विकून टाकू नका, कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके व उपरे आहात
लेवीय 25 वाचा
ऐका लेवीय 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 25:18-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ