YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 1

1
होमार्पणे
1परमेश्वराने दर्शनमंडपातून मोशेला हाक मारून म्हटले, 2“इस्राएल लोकांना असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील तेव्हा त्याने तो गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांतला अर्पावा.
3गुराढोरांतले होमार्पण अर्पायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापुढे अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल.
4यज्ञपशूच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्या प्रायश्‍चित्तादाखल मान्य होईल.
5त्याने परमेश्वरासमोर त्या गोर्‍ह्याचा वध करावा, आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त अर्पून दर्शनमंडपाच्या दारापुढे असलेल्या वेदीवर सभोवती शिंपडावे.
6मग त्या यज्ञपशूचे कातडे काढावे आणि पशूचे कापून तुकडे करावेत.
7नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा आणि त्याच्यावर लाकडे रचावीत;
8आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर पशूचे ते तुकडे, डोके व चरबी रचावी.
9त्याची आतडी आणि पाय त्याने पाण्याने धुवावेत. मग याजकाने त्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे; ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.
10शेरडामेंढरांतले होमार्पण करायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा.
11त्याने त्याचा वध परमेश्वरासमोर वेदीच्या उत्तर बाजूस करावा, आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.
12त्याने त्याचे कापून तुकडे करावेत आणि त्याचे डोके व चरबी ह्यांसहित सर्व तुकडे याजकाने वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर रचावेत.
13त्याची आतडी व पाय त्याने पाण्याने धुवावेत. मग याजकाने ह्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे; हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.
14परमेश्वराप्रीत्यर्थ त्याला पक्ष्याचे होमार्पण करायचे असल्यास होले किंवा पारव्याची पिले त्याने अर्पावीत.
15याजकाने तो पक्षी वेदीजवळ नेऊन त्याचे मुंडके मुरगळून तोडून वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे;
16त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस राख टाकण्याच्या ठिकाणी फेकून द्यावीत.
17पंखांच्या मधोमध त्याने तो फाडावा, पण ते भाग वेगळे करू नयेत; मग याजकाने वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर त्याचा होम करावा; हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.

सध्या निवडलेले:

लेवीय 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन