त्याने आपले बाण माझ्या अंतर्यामात शिरवले आहेत. मी आपल्या सर्व लोकांत दिवसभर उपहासाचा व निंदाव्यंजक पोवाड्यांचा विषय झालो आहे. त्याने मला क्लेशाने व्यापले आहे, तो मला कडू दवणा पाजतो. त्याने मला आपल्या दातांनी खडे फोडायला लावले आहे; त्याने मला राखेने माखून काढले आहे. तू माझ्या जिवाला शांतीपासून दूर ठेवले आहेस; समृद्धीला मी पारखा झालो आहे. तेव्हा मी म्हणालो, “माझी जीवनशक्ती, परमेश्वराची मला वाटत असलेली आशा, गेली आहे.” माझी विपत्ती व माझे भ्रमण, कडू दवणा व विष ह्यांचे स्मरण कर. माझा जीव त्यांचे स्मरण करीत राहतो म्हणून तो माझ्या ठायी गळला आहे. हे मी मनात आणतो म्हणून मला आशा आहे. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे. “परमेश्वर माझा वतनभाग आहे”, असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना, जो जीव त्याला शरण जातो त्याला, परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वरापासून येणार्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे. मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे.
विलापगीत 3 वाचा
ऐका विलापगीत 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: विलापगीत 3:13-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ