YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 6:1-8

यहोशवा 6:1-8 MARVBSI

(इस्राएल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.) परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे ह्या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा. सात याजकांनी सात रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुंकावीत. रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.” नंतर नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने याजकांना बोलावून म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजक सात रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चाला.” तो लोकांना म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कोशापुढे चालावे.” यहोशवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे सात याजक परमेश्वरापुढे सात रणशिंगे फुंकत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला.