लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या डेर्यातून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले; कोश वाहणारे यार्देनेपर्यंत येऊन पोहचले आणि कोश वाहणार्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (सुगीच्या दिवसांत यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते); तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बर्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगराजवळ साठून चढले व त्याची रास झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले; मग ते लोक यरीहोसमोर पार उतरून गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले, आणि सर्व इस्राएल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देनेपलीकडे निघून गेले.
यहोशवा 3 वाचा
ऐका यहोशवा 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहोशवा 3:14-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ