तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरवले; कारण तिचे घर गावकुसाला लागून होते आणि तेथे गावकुसावरच ती राहत होती. तिने त्यांना सांगितले होते की, “तुमचा पाठलाग करणार्यांनी तुम्हांला गाठू नये म्हणून तुम्ही डोंगरवटीकडे जा आणि तेथे तीन दिवस लपून राहा; तोपर्यंत तुमचा पाठलाग करणारे परत येतील; मग तुम्ही मार्गस्थ व्हा.” ते पुरुष तिला म्हणाले होते, “तू आमच्याकडून जी शपथ वाहवली आहेस तिच्या बाबतीत आम्हांला दोष न लागो; मात्र आम्ही ह्या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हांला उतरवलेस, तिला हा किरमिजी दोर बांध आणि ह्या घरात तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचे सबंध घराणे तुझ्याजवळ एकत्र कर. कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही; पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील. जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू वाहवली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ.” ती म्हणाली, “तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल.” ह्याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले; नंतर तिने किरमिजी दोर आपल्या खिडकीला बांधला.
यहोशवा 2 वाचा
ऐका यहोशवा 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहोशवा 2:15-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ