YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 19:1-48

यहोशवा 19:1-48 MARVBSI

दुसरी चिठ्ठी शिमोनाची म्हणजे शिमोनी वंशाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली; यहूदाच्या वंशजांच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले. त्यांना ही नगरे वतन मिळाली : बैर-शेबा, शेबा व मोलादा; हसर-शुवाल, बाला व असेम; एल्तोलाद, बथूल व हर्मा; सिकलाग, बेथ-मर्का-बोथ व हसरसूसा; बेथ-लबवोथ आणि शारूहेन; ही तेरा नगरे व त्यांखालील खेडी; अईन, रिम्मोन, एतेर व आशान; ही चार नगरे व त्यांखालील खेडी; आणि बालथ-बैर, ज्याला नेगेबमधील रामा म्हणतात तेथपर्यंत ह्या नगरांच्या सभोवतालची सगळी खेडी त्यांना मिळाली. शिमोनी वंशजांचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन होय. शिमोनाच्या वंशजांना यहूदाच्या वंशजांच्या वतनातूनच वाटा देण्यात आला. यहूदी वंशाचा वाटा त्यांच्यासाठी फार मोठा होता, म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजांना वतन मिळाले. जबुलूनाला देण्यात आलेला प्रदेश तिसरी चिठ्ठी जबुलून वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली; त्यांच्या वतनाची सीमा सारीदपर्यंत आहे; त्यांची सीमा पश्‍चिमेस मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामासमोरील ओहोळास जाऊन लागते; सारीद येथून ती पूर्वेकडे उगवतीस वळून किसलोथ-ताबोर ह्याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते; तेथून पूर्व दिशेकडे गथ-हेफेर व इत्ता-कासीन येथवर जाते; आणि तेथून रिम्मोनपासून नेयापर्यंत येते; तेथून ती सीमा त्याला वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफताएल खोर्‍यात संपते; कट्टाथ, नहलाल, शुम्रोन, इदला, बेथलेहेम आदिकरून बारा नगरे व त्यांखालील खेडी त्यांना मिळाली. जबुलून वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्यांखालील खेडी, त्यांच्या कुळांप्रमाणे ही होत. चौथी चिठ्ठी इस्साखाराची म्हणजे इस्साखाराच्या वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली. त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती; इज्रेल, कसुल्लोथ व शूनेम; हफराईम, शियोन व अनाहराथ; रब्बीथ, किशोन व अबेस; रेमेथ, एन-गन्नीम, एन-हद्दा व बेथ-पसेस. त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश येथवर जाते आणि ती यार्देनेजवळ संपते; त्यांना ही सोळा नगरे व त्यांखालील खेडी मिळाली. इस्साखाराच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्यांखालील खेडी त्यांच्या कुळांप्रमाणे ही होत. पाचवी चिठ्ठी आशेराच्या वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली. त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती : हेलकथ, हली, बटेन व अक्षाफ; अल्लामेलेख अमाद व मिशाल. त्यांची सीमा पश्‍चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते; तेथून ती वळून उगवतीस बेथ-दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलूनाच्या वतनापर्यंत आणि इफताहएल खोर्‍याच्या उत्तरेकडून बेथ-एमेक व नियेल येथपर्यंत जाते व तशीच ती उत्तरेकडे काबूल येथे जाते; तेथून ती एब्रोन, रहोब, हम्मोन व काना ह्यावरून जाऊन मोठे सीदोन येथपर्यंत जाते; तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते; तेथून ती होसाकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्रास मिळते; उम्मा, अफेक व रहोब ह्यांसह एकंदर बावीस नगरे व त्यांखालील खेडी त्यांना मिळाली; आशेराच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्यांखालील खेडी, त्यांच्या कुळांप्रमाणे ही होत. सहावी चिठ्ठी नफतालीची म्हणजे नफतालीच्या वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली. त्यांची सीमा हेलेफ आणि साननीमातील एला वृक्ष ह्यांपासून अदामीनेकेब व यबनेल ह्यांवरून लक्कूम येथे जाऊन यार्देनेजवळ संपते; तेथून ती पश्‍चिमेस वळून अजनोथ-ताबोर येथे जाते व तेथून हुक्कोक येथे जाते व तेथून दक्षिणेस जबुलूनाच्या वतनापर्यंत आणि पश्‍चिमेस आशेराच्या वतनापर्यंत जाऊन उगवतीस यार्देनेजवळ यहूदाच्या वतनाला मिळते. त्यातील तटबंदीची नगरे ही : सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ; अदामा, रामा व हासोर; केदेश, एद्रई व एन-हासोर; इरोन, मिग्दल-एल हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेश ही एकोणीस नगरे व त्यांखालील खेडी. नफतालीच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्यांखालील खेडी, त्यांच्या कुळांप्रमाणे ही होत. सातवी चिठ्ठी दानाच्या वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली. त्यांच्या वतनाच्या सीमेच्या आत ही नगरे होती : सरा, एष्टावोल व ईर-शेमेश; शालब्बीन, अयालोन व इथला; एलोन, तिम्ना व एक्रोन; एल्तके, गिब्बथोन व बालाथ; यहूद, बने-बराक व गथरिम्मोन; मी-यर्कोन, रक्कोन आणि याफोच्या पूर्वेकडील प्रदेश. दानाच्या वंशजांनी आपला प्रदेश वाढवला. त्यांनी लेशेमावर स्वारी करून ते लढून घेतले; तलवारीने त्यांचा विध्वंस केला आणि त्याचा ताबा घेऊन तेथे वस्ती केली; आणि लेशेमास आपला मूळ पुरुष दान ह्याचे नाव दिले. दानाच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे आणि त्यांखालील खेडी, त्यांच्या कुळांप्रमाणे ही होत.