बन्यामिनाच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे मिळालेला वाटा हा : त्यांचा वाटा यहूदाचे वंशज आणि योसेफाचे वंशज ह्यांच्या प्रांताच्या दरम्यान होता. त्यांची सीमा उत्तरेस यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तर बाजूने वर जाऊन पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून बेथ-आवेनच्या रानापर्यंत जाते. तेथून ती लूज उर्फ बेथेल येथे जाते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेकडल्या पहाडापासून अटारोथ-अद्दार येथे येते. तेथून मग पश्चिम सीमा दक्षिणेकडे वळून बेथ-होरोनाच्या पूर्वेकडून त्याच्या दक्षिणेकडील पहाडावरून यहूदाचे नगर किर्याथ-बाल उर्फ किर्याथ-यारीम येथे जाते; ह्याची पश्चिम सीमा हीच. दक्षिणेकडील सीमा पश्चिमेकडे सुरू होऊन किर्याथ-यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नफ्तोह पाणवठ्यावर जाते; तेथून हिन्नोमपुत्राच्या खोर्याच्या पूर्वेस व रेफाईम खोर्याच्या उत्तरेस असलेल्या पहाडांच्या उत्तर टोकापासून हिन्नोम खोर्यात म्हणजे यबूसी ह्यांच्या दक्षिणेकडे ती सीमा एन-रोगेल येथे उतरते; तेथून ती सीमा उत्तरेकडे वळून एन-शेमेश येथे निघते आणि तशीच अदुम्मीम चढावाच्या पूर्वेस असलेल्या गलीलोथाकडे जाते; तेथून ती रऊबेनपुत्र बोहन ह्याच्या खडकाकडे जाते. मग ती उत्तरेकडे जाऊन बेथ-अराबाच्या बाजूने खाली अराबात येते. तेथून ती सीमा बेथ-होग्लाच्या उत्तर दिशेस जाऊन क्षार समुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेस यार्देनेच्या मुखाजवळ जाते; ही दक्षिण सीमा होय. यार्देन ही त्याची पूर्व सीमा होय. बन्यामिनाच्या संतानाचे वतन त्याच्या चतुःसीमांसहित त्यांच्या कुळांप्रमाणे हे आहे. बन्यामीन वंशाच्या लोकांना त्यांच्या-त्यांच्या कुळां-प्रमाणे ही नगरे मिळाली : यरीहो, बेथ-होग्ला, एमेक-केसीस, बेथ-अराबा, समाराईम, बेथेल, अव्वीम, पारा, अफ्रा, कफर-अम्मोनी, अफनी आणि गेबा; ही बारा नगरे व त्यांखालील खेडी; गिबोन, रामा व बैरोथ; मिस्पे, कफीरा व मोजा; रेकेम, इर्पैल व तरला; सेला, एलेफ, यबूसी, हेच यरुशलेम, गिबाथ व किर्याथ; ही चौदा नगरे व त्यांखालील खेडी; बन्यामिनाच्या वंशजांचे त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे हे वतन आहे.
यहोशवा 18 वाचा
ऐका यहोशवा 18
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहोशवा 18:11-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ