YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 15:20-63

यहोशवा 15:20-63 MARVBSI

यहूदाच्या संतानाच्या वंशांतील कुळांप्रमाणे त्यांचे वतन हे : यहूदाच्या संतानाच्या वंशाला दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील ही नगरे मिळाली : कबसेल, एदेर व यागूर; कीना, दीमोना व अदादा; केदेश, हासोर व इथनान; जीफ, टेलेम व बालोथ; हासोरहदत्ता व करीयोथ-हेस्रोन (हेच हासोर); अमाम, शमा व मोलादा; हसरगदा, हेष्मोन व बेथ-पेलेट; हसरशुवाल, बैर-शेबा व बिजोथा; बाला, ईयीम व असेम; एल्तोलाद, कसील व हर्मा; सिकलाग, मद्मन्ना व सन्सन्ना; लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन. अशी एकंदर एकोणतीस नगरे व त्यांखालील खेडी मिळाली. तळवटीतील नगरे ही : एष्टावोल, सरा व अषणा; जानोह, एनगन्नीम, तप्पूहा व एनाम; यर्मूथ, अदुल्लाम, सोखो व अजेका; शाराईम, अदीथईम, गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे व त्यांखालील खेडी : सनान व दहाशा व मिग्दल-गाद; दिलान, मिस्पे व यकथेल; लाखीश, बसकाथ व एग्लोन; कब्बोन, लहमाम व किथलीश; गदेरोथ, बेथ-दागोन, नामा व मक्केदा, अशी सोळा नगरे व त्यांखालील खेडी. लिब्ना, एथेर व आशान; इफ्ताह, अषणा व नसीब; कईला, अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे व त्यांखालील खेडी. एक्रोन, त्याची उपनगरे व खेडी, एक्रोनाजवळची व पश्‍चिमेची अश्दोदाच्या बाजू-कडली सर्व नगरे व त्यांखालील खेडी. अश्दोद, त्याची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याची उपनगरे व खेडी; मिसरचा नाला व महासमुद्राच्या तीरावरली नगरे. आणि डोंगरवटीतली नगरे ही : शामीर, यत्तीर व सोखो; दन्ना किर्याथ-सन्ना (हेच दबीर); अनाब, एष्टमो व अनीम; गोशेन, होलोन व गिलो, अशी अकरा नगरे व त्यांखालील खेडी. अराब, दूमा व एशान; यानीम बेथ-तप्पूहा व अफेका; हुमटा, किर्याथ-अर्बा (हेच हेब्रोन) व सियोर; अशी नऊ नगरे व त्यांखालील खेडी. मावोन, कर्मेल, जीफ व यूटा; इज्रेल, यकदाम व जानोह; काइन, गिबा व तिम्ना; अशी दहा नगरे व त्यांखालील खेडी. हल्हूल, बेथ-सूर, गदोर; माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; अशी सहा नगरे व त्यांखालील खेडी. किर्याथ-बाल (हेच किर्याम-यारीम) व राब्बा; ही दोन नगरे व त्यांखालील खेडी. रानातली नगरे ही : बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा; निबशान, क्षारनगर व एन-गेदी; अशी सहा नगरे व त्यांखालील खेडी. यरुशलेमेत राहणार्‍या यबूसी लोकांना घालवून देणे यहूदाच्या वंशजांना शक्य झाले नाही म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत यहूदाच्या वंशजांबरोबर राहत आहेत.