परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने यहूदाच्या वंशजांबरोबर वतन दिले तेच किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन होय; हा अर्बा अनाक्यांचा मूळ पुरुष. कालेबाने शेशय, अहीमान व तलमय ह्या अनाकाच्या तीन वंशजांना तेथून घालवून दिले. तेथून त्याने दबीराच्या रहिवाशांवर हल्ला केला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते. कालेब म्हणाला, “जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील त्याला मी आपली मुलगी अखसा देईन.” तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याने ते नगर घेतले; म्हणून कालेबाने आपली मुलगी अखसा त्याला दिली. ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली1 तेव्हा कालेबाने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, “मला एक देणगी द्या; तुम्ही मला नेगेब दिले आहे, तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या;” तेव्हा त्याने वरचे झरे आणि खालचे झरे तिला दिले.
यहोशवा 15 वाचा
ऐका यहोशवा 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहोशवा 15:13-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ