YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 14:10-13

यहोशवा 14:10-13 MARVBSI

इस्राएल रानात प्रवास करत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले तेव्हापासून आज पंचेचाळीस वर्षे परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे; आज बघ, मी पंचाऐंशी वर्षांचा आहे. मोशेने मला पाठवले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे; लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्या वेळी होती तेवढीच आजही आहे. तेव्हा परमेश्वराने त्या वेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे; तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन.” मग यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन वतन करून दिले