YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 12:1-6

यहोशवा 12:1-6 MARVBSI

ज्या राजांना ठार मारून त्यांचे यार्देनेपलीकडे उगवतीकडील आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंत असलेले प्रदेश आणि पूर्वेकडील सर्व इस्राएल लोकांनी काबीज केले ते राजे हे : अमोर्‍यांचा हेशबोननिवासी राजा सीहोन; आर्णोन खोर्‍याच्या कडेवरल्या अरोएर नगरापासून व त्याच खोर्‍याच्या मध्यापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत असलेल्या अर्ध्या गिलादावर, आणि पूर्वेस किन्नेरोथ सरोवरापासून बेथ-यशिमोथाच्या वाटेवरल्या अराबापर्यंत म्हणजे पूर्वेकडील अराबाच्या समुद्रापर्यंत किंवा क्षार समुद्रापर्यंत आणि दक्षिणेस पिसगाच्या उतरणीपर्यंत त्याची सत्ता होती; उरलेल्या रेफाई लोकांतला बाशानाचा राजा ओग; हा अष्टारोथ व एद्रई येथे राहत असे, आणि हर्मोन पर्वत, सलका, गशूरी व माकाथी ह्यांच्या सीमेपर्यंतचा सगळा बाशान प्रांत आणि हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत अर्ध्या गिलादावर त्याची सत्ता होती. ह्यांचा मोड परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक ह्यांनी केला होता; आणि परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तो रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतन म्हणून दिला होता. यहोशवाने पराभूत केलेले राजे