YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योना 3:6-10

योना 3:6-10 MARVBSI

निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोणताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की, “कोणा माणसाने, पशूने, गुराढोरांनी व शेरडामेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये. तर मनुष्याने व पशूने गोणताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आपल्या हातच्या जुलूमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.” देवाने त्यांचे वर्तन पाहिले म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले; तेव्हा ‘त्यांच्यावर अरिष्ट आणीन’ असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही.