YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योना 1:11-17

योना 1:11-17 MARVBSI

ते त्याला विचारू लागले की, “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे?” समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. तो त्यांना म्हणाला, “मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुमच्यावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे.” जहाज किनार्‍याला लावावे म्हणून ती माणसे वल्ही मारमारून थकली, पण त्यांना ते साधेना, कारण समुद्र त्यांच्यावर अधिकाधिक खवळत चालला होता. तेव्हा ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले, “हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो की ह्या माणसाच्या जिवामुळे आम्हांला मारू नकोस व निर्दोष जीव घेतल्याचा दोष आमच्यावर आणू नकोस; कारण तू परमेश्वर आहेस, तुला इष्ट ते तू करतोस.” मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले तेव्हा समुद्र खवळायचा राहिला. त्या माणसांना तर परमेश्वराचा फार धाक पडला; त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केले. परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला होता; योना त्या माशाच्या पोटात तीन दिवस व तीन रात्री होता.