नंतर ईयोबाने तोंड उघडून आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. ईयोब म्हणाला, “मी जन्मलो तो दिवस जळो! ‘पुरुषगर्भ राहिला’ असे जी रात्र म्हणाली ती जळो! तो दिवस अंधार होवो; ईश्वर त्या दिवसाची निगा न करो; त्यावर प्रकाश न पडो. अंधकार व मृत्युच्छाया ही त्याला आपला आप्त लेखोत; तो दिवस अभ्राच्छादित होवो; दिवसास जे काळोखी आणते ते सर्व त्याला भयभीत करो. काय ती रात्र! काळोख तिला पछाडो! वर्षाच्या दिनमालिकेत ती आनंद न करो; महिन्याच्या तिथीत तिची गणना न होवो. पाहा! ती रात्र निष्फळ असो; तिच्यात आनंदघोषाचा प्रवेश न होवो. दिवसाला शाप देणारे, लिव्याथानाला1 चेतवण्यात निपुण असणारे तिला शाप देवोत. तिच्या प्रभातसमयीचे तारे अंधकारमय होवोत; ती प्रकाशाची अपेक्षा करो, पण तिला तो न मिळो, तिला उषानेत्रांचे दर्शन न घडो; कारण तिने माझ्या मातेचे गर्भाशयद्वार बंद केले नाही, दुःख माझ्या डोळ्यांआड ठेवले नाही.
ईयोब 3 वाचा
ऐका ईयोब 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 3:1-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ