ह्यानंतर येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापांत मराल; मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही.” ह्यावर यहूदी म्हणाले, “‘मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही’ असे हा म्हणतो, ह्यावरून हा आत्महत्या तर करणार नाही?” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे, तुम्ही ह्या जगाचे आहात, मी ह्या जगाचा नाही. म्हणून मी तुम्हांला सांगितले की, तुम्ही आपल्या पापांत मराल; कारण मी तो आहे1 असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापांत मराल.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुम्ही कोण आहात?” येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हांला जे सांगत आलो तेच नाही का?2 मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे; परंतु ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगास सांगतो.” तो आपल्याबरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्यांना समजले नाही. म्हणून येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हांला समजेल की तो मी आहे आणि मी आपण होऊन काही करत नाही तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो.” तो ह्या गोष्टी बोलत असता पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात; तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.” ते त्याला म्हणाले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो; तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदासर्वदा राहत नाही, पुत्र सदासर्वदा राहतो. म्हणून जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल.
योहान 8 वाचा
ऐका योहान 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 8:21-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ