मग अर्धा सण आटोपल्यावर येशू वर मंदिरात जाऊन शिक्षण देऊ लागला. ह्यावरून यहूदी आश्चर्य करून म्हणू लागले, “शिकल्यावाचून ह्याला विद्या कशी आली?” त्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठवले त्याची आहे. जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो हे समजेल. जो आपल्या मनचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव पाहतो; परंतु ज्याने त्याला पाठवले त्याचा गौरव जो पाहतो तो खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही. मोशेने तुम्हांला नियमशास्त्र दिले की नाही? तरी तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळत नाही. तुम्ही मला जिवे मारायला का पाहता?” लोकसमुदायाने उत्तर दिले, “तुला भूत लागले आहे; तुला जिवे मारायला कोण पाहतो?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्य करता. मोशेने तुम्हांला सुंता लावून दिली (तरी ती मोशेपासून नाही तर पूर्वजांपासून आहे) व शब्बाथ दिवशी तुम्ही माणसांची सुंता करता. मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्बाथ दिवशी होते तर मी शब्बाथ दिवशी एका मनुष्याला अगदी बरे केले ह्यामुळे तुम्ही माझ्यावर रागावता काय? वरवर पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”
योहान 7 वाचा
ऐका योहान 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 7:14-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ