YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 4:4-9

योहान 4:4-9 MARVBSI

आणि त्याला शोमरोनामधून जावे लागले. मग तो शोमरोनामधून सूखार नावाच्या नगरास आला; ते याकोबाने आपला मुलगा योसेफ ह्याला दिलेल्या शेताजवळ होते. तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झर्‍यावर बसला; तेव्हा सुमारे सहावा तास होता. तेथे शोमरोनाची एक स्त्री पाणी काढण्यास आली. तिला येशू म्हणाला, “मला प्यायला पाणी दे.” कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते. तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहूदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे?” कारण यहूदी शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात.

योहान 4:4-9 साठी चलचित्र