YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 3:27-36

योहान 3:27-36 MARVBSI

योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्यापुढे पाठवलेला आहे असे मी म्हणालो होतो, ह्याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात. वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे, त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो; तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा र्‍हास व्हावा हे अवश्य आहे.” जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे; जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे व ऐहिक गोष्टी बोलतो; जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो; आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही. ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्याने देव सत्य आहे ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे. कारण ज्याला देवाने पाठवले तो देवाची वचने बोलतो; कारण देव तो आत्मा मोजूनमापून देत नाही. पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्रावर विश्‍वास ठेवीत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.

योहान 3:27-36 साठी चलचित्र