YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 21:9-13

योहान 21:9-13 MARVBSI

मग किनार्‍यावर उतरल्यावर त्यांनी कोळशांचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा.” शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्‍यावर ओढून आणले; तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले, म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारण्यास शिष्यांतील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली; तशीच मासळीही दिली.

संबंधित व्हिडिओ