मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले, आणि तो आपला वधस्तंभ स्वत: वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसर्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसर्याला दुसर्या बाजूस आणि येशूला मध्ये, असे वधस्तंभावर खिळले. पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली; तिच्यावर “यहूद्यांचा राजा नासोरी येशू” असे लिहिले होते. येशूला वधस्तंभावर खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमी व हेल्लेणी ह्या भाषांत लिहिली होती.
योहान 19 वाचा
ऐका योहान 19
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 19:16-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ