YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 18:1-8

योहान 18:1-8 MARVBSI

हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला; तेथे बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले. ही जागा त्याला धरून देणार्‍या यहूदालाही ठाऊक होती; कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परूशी ह्यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहूदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधता?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” येशू त्यांना म्हणाला, “मीच तो आहे.” त्याला धरून देणारा यहूदाही त्यांच्याबरोबर उभा होता. “मीच तो आहे” असे म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा त्याने त्यांना पुन्हा विचारले, “कोणाला शोधता?” ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.” येशूने उत्तर दिले, “मीच तो आहे असे मी तुम्हांला सांगितले; तुम्ही मला शोधत असाल तर ह्यांना जाऊ द्या.”

योहान 18:1-8 साठी चलचित्र