YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 49:34-39

यिर्मया 49:34-39 MARVBSI

यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या राज्याच्या आरंभी एलामाविषयी यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे : “सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, त्यांच्या बलाचा मुख्य आधार जे एलामाचे धनुष्य ते मी मोडून टाकीन. एलामावर आकाशाच्या चारही भागांतून मी चार वारे सोडीन व त्यांना त्या चारही दिशांना विखरीन; ज्यात एलामाचे पांगलेले लोक गेले नाहीत असे एकही राष्ट्र सापडायचे नाही. एलामाचा घात करू पाहणार्‍या त्याच्या शत्रूंपुढे मी त्यांना घाबरे करीन; मी त्यांच्यावर अरिष्ट, माझा संतप्त क्रोध आणीन, असे परमेश्वर म्हणतो; मी त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन. मी एलामात आपले सिंहासन मांडीन आणि तेथून राजा व सरदार ह्यांचा नाश करीन, असे परमेश्वर म्हणतो. तरी पुढील काळी मी एलामाचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.”