कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, न्यायाने पाहता ज्यांना पेला प्यायचा नव्हता त्यांना तो प्यावा लागेल; तर तू कोणतीही शिक्षा झाल्यावाचून राहशील काय? तू शिक्षा झाल्यावाचून राहणार नाहीस, तुला पेला प्यावाच लागेल. परमेश्वर म्हणतो, मी आपल्या जीविताची शपथ वाहिली आहे की बसरा विस्मय, निंदा, उजाडी व शाप ह्यांना पात्र होईल; त्याची सर्व नगरे कायमची ओसाड होतील.” मी परमेश्वराकडून वर्तमान ऐकले आहे; राष्ट्रांत जासूद पाठवला आहे; “तुम्ही सर्व एकत्र व्हा, तिच्यावर चढाई करा, युद्धास उभे राहा.” कारण पाहा, मी तुला राष्ट्रांमध्ये क्षुद्र केले आहे, मानवांमध्ये तुला तुच्छ केले आहे. जी तू कड्याच्या कपारीत राहतेस, टेकडीच्या माथ्याचा आश्रय करून बसतेस, त्या तुला तुझ्या विक्राळपणाने, तुझ्या मनाच्या गर्वाने फसवले आहे; तू आपले कोटे गरुडाप्रमाणे उंच ठिकाणी केले असले तरी तेथून मी तुला खाली आणीन, असे परमेश्वर म्हणतो. “अदोम भयावह होईल; प्रत्येक येणाराजाणारा तिला पाहून विस्मय पावेल, तिच्या सर्व पीडा पाहून तिचा उपहास करील. परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांच्याजवळची गावे जशी उद्ध्वस्त झाली त्याप्रमाणे तेथे कोणी राहणार नाही; एकही मनुष्य तेथे बिर्हाड करणार नाही.
यिर्मया 49 वाचा
ऐका यिर्मया 49
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यिर्मया 49:12-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ