सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षी चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी नगराच्या तटास त्यांनी खिंडार पाडले; अशा प्रकारे यरुशलेम हस्तगत केल्यावर असे झाले की, बाबेलच्या राजाचे सर्व सरदार म्हणजे नेर्गल-शरेसर, समगार-नबो, सर्सखीम, रब-सारीस, नेर्गल-शरेसर, रब-माग व बाबेलच्या राजाचे वरकड सरदार हे सर्व मधल्या वेशीत येऊन बसले. हे पाहून यहूदाचा राजा सिद्कीया व सर्व योद्धे ह्यांनी पलायन केले; ते रात्री राजाच्या बागेच्या वाटेने, दोहो तटांमधल्या वेशीने नगराबाहेर निघून गेले; राजा अराबाच्या मार्गाने गेला. खास्द्यांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग करून यरीहोच्या मैदानात सिद्कियाला गाठले; त्यांनी त्याला पकडून हमाथ प्रांतातले रिब्ला येथे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्यापुढे आणले; त्याने त्याची शिक्षा ठरवली. रिब्ला येथे बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत त्याचे पुत्र वधले; त्याप्रमाणेच बाबेलच्या राजाने यहूदाचे सर्व मानकरी वधले; आणखी त्याने सिद्कीयाचे डोळे फोडून त्याला बाबेलास रवाना करण्यासाठी बेड्यांनी जखडले. खास्दी लोकांनी राजगृह व लोकांची घरे अग्नीने जाळली व यरुशलेमेचा कोट मोडून टाकला. तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने नगरात अवशिष्ट राहिलेले लोक आणि जे फितून त्याच्याकडे गेले होते ते आणि जे कोणी लोक शेष राहिले होते ते, अशा सर्वांना कैद करून बाबेलास नेले. तथापि जे लोक लाचार असून ज्यांच्याजवळ काहीएक नव्हते अशांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने यहूदा देशात राहू दिले; त्याच वेळेस त्याने त्यांना द्राक्षांचे मळे व शेते दिली.
यिर्मया 39 वाचा
ऐका यिर्मया 39
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यिर्मया 39:2-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ