YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 39:11-18

यिर्मया 39:11-18 MARVBSI

यिर्मयाविषयी तर बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याला ताकीद केली की, “त्याला नेऊन त्याची चांगली व्यवस्था ठेव; त्याला काही इजा करू नकोस; तो तुला सांगेल तशी त्याची व्यवस्था लाव.” तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने आणि नबूशजबान, रब-सारीस, नेर्गल-शरेसर, रब-माग व बाबेलच्या राजाचे सर्व मुख्य अंमलदार ह्यांनी माणसे पाठवून यिर्मयाला पहारेकर्‍यांच्या चौकातून काढले व घरी न्यावे म्हणून त्याला गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याच्या स्वाधीन केले; मग तो लोकांत जाऊन राहिला. यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात कैदी होता तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले ते असे : “जा, एबद-मलेख कूशी ह्याला सांग की, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी आपल्या वचनाप्रमाणे ह्या नगराचे हित नव्हे तर अहित होईल असे करीन; त्या दिवशी तुझ्यादेखत ती वचने पूर्ण होतील. तुला तर त्या दिवशी मी मुक्त करीन, असे परमेश्वर म्हणतो; ज्यांची तुला भीती वाटते त्यांच्या हाती तुला देणार नाहीत. मी खातरीने तुझा बचाव करीन; तू तलवारीने पडणार नाहीस, तू जिवानिशी सुटशील; कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे परमेश्वर म्हणतो.”