ते त्याला म्हणाले, “नाही, पण आम्ही तुला घट्ट बांधून त्यांच्या हवाली करू; खरेच, आम्ही तुला ठार मारणार नाही.” मग त्यांनी त्याला दोन नव्या दोरांनी बांधून खडकावरून आणले. तो लेहीपर्यंत येऊन पोहचला तेव्हा पलिष्टी त्याला पाहून जयघोष करू लागले. इतक्यात परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला. त्याच्या दंडांना बांधलेले दोर अग्नीत जळून गेलेल्या तागासारखे झाले आणि हाताची बंधने गळून पडली. मग गाढवाचे नवे जाभाड त्याला सापडले; ते हातात घेऊन एक हजार लोकांना त्याने ठार केले. शमशोन म्हणाला, “गाढवाच्या जाभाडाने मी राशींच्या राशी रचल्या; गाढवाच्या जाभाडाने मी हजार लोक ठार केले.” हे आपले बोलणे संपवून त्याने हातातले जाभाड फेकून दिले व त्या ठिकाणाचे नाव रामथ-लेही (जाभाडाची टेकडी) असे ठेवले. नंतर त्याला फार तहान लागल्यामुळे तो परमेश्वराचा धावा करत म्हणाला, “तू आपल्या दासाच्या हस्ते एवढा मोठा विजय मिळवून दिलास खरा, पण मी आता तहानेने तडफडून मरावे आणि बेसुनत लोकांच्या हाती पडावे काय?” तेव्हा परमेश्वराने लेही येथे एक खळगा फोडून उघडला आणि त्यातून पाणी वाहू लागले. ते पाणी पिऊन त्याच्या जिवात जीव आला व तो ताजातवाना झाला. ह्यावरून त्याचे नाव त्याने एन-हक्कोरे (धावा करणार्यांचा झरा) असे ठेवले. तो अद्याप लेहीत आहे. पलिष्ट्यांच्या अमदानीत वीस वर्षे शमशोनाने इस्राएलाचा न्यायनिवाडा केला.
शास्ते 15 वाचा
ऐका शास्ते 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: शास्ते 15:13-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ