YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 14:1-4

शास्ते 14:1-4 MARVBSI

शमशोन तिम्ना येथे गेला; तेथे त्याने एक पलिष्टी मुलगी पाहिली. तेव्हा घरी परत येऊन आपल्या आईवडिलांकडे जाऊन तो म्हणाला, “तिम्ना येथे मी एक पलिष्टी मुलगी पाहिली आहे; ती मला बायको करून द्या.” त्याचे आईबाप त्याला म्हणाले, “तू त्या बेसुनत पलिष्ट्यांतली बायको का करू पाहत आहेस? तुझ्या भाऊबंदांत किंवा आपल्या सार्‍या लोकांत कोणी मुली नाहीत काय?” शमशोन आपल्या बापाला म्हणाला, “तीच मला मिळवून द्या; कारण माझे तिच्यावर मन बसले आहे.” पलिष्ट्यांना विरोध करण्याची संधी मिळावी म्हणून ही गोष्ट परमेश्वर करत आहे हे त्याच्या आईबापांच्या लक्षात आले नाही. त्या काळी इस्राएलावर पलिष्ट्यांची सत्ता होती.