YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 5:11-15

याकोब 5:11-15 MARVBSI

पाहा, ‘ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.’ तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हे तुम्हांला दिसून आले. माझ्या बंधूंनो, मुख्यत: शपथ वाहू नका; स्वर्गाची, पृथ्वीची, किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका; तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हांला ‘होय’ म्हणायचे तर ‘होय’ म्हणा; ‘नाही’ म्हणायचे तर ‘नाही’ म्हणा. तुमच्यापैकी कोणी दु:ख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदात आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत. तुमच्यापैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना1 बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखणाइताला वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असतील तर त्याला क्षमा होईल.