श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्यस्वभावाला वश होत आहे, आणि झाला आहे; परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही; ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत. झर्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्षवेलाला अंजीर येतील काय? तसेच खार्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही.
याकोब 3 वाचा
ऐका याकोब 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: याकोब 3:7-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ