YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 3:2-6

याकोब 3:2-6 MARVBSI

कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला, तर त्यांचे सर्व शरीर आपण फिरवतो. तारवेही पाहा, ती एवढी मोठी असतात व प्रचंड वार्‍याने लोटली जात असतात, तरी सुकाणदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने फिरवली जातात. तशीच जीभही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते! जीभ ही आग आहे; ती अनीतीचे भुवन आहे; आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे; ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे.