मी त्यांना एक चिन्ह दाखवीन; त्याच्यातून जे वाचतील त्यांना मी तार्शीश, पूल व लूद अशा धनुर्धारी राष्ट्रांकडे पाठवीन; ज्यांनी माझे नाम ऐकले नाही, माझा महिमा पाहिला नाही, अशा तुबाल व यावान ह्या दूरच्या द्वीपांत मी त्यांना पाठवीन; ते अन्य राष्ट्रांत माझा महिमा प्रकट करतील. परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिरात जसे इस्राएल लोक परमेश्वरास शुद्ध पात्रांतून अन्नार्पण आणतात तसे सर्व राष्ट्रांमधून तुमच्या बांधवांना अर्पण म्हणून घोड्यांवर, रथांत, पालख्यांत, खेचरांवर व सांडणींवर बसून यरुशलेमेस माझ्या पवित्र पर्वतावर आणतील. त्यांच्यातून काही जण याजक व लेवी व्हावेत म्हणून मी घेईन, असे परमेश्वर म्हणतो. कारण मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीन; ती जशी माझ्यासमोर टिकून राहतील तसा तुमचा वंश व तुमचे नाव टिकून राहील असे परमेश्वर म्हणतो. असे होईल की, एका चंद्रदर्शनापासून दुसर्या चंद्रदर्शनापर्यंत, एका शब्बाथापासून दुसर्या शब्बाथापर्यंत सर्व मनुष्यजाती माझ्यापुढे भजनपूजन करण्यास येईल, असे परमेश्वर म्हणतो. ज्या माणसांनी माझ्याविरुद्ध बंड केले त्यांची प्रेते ते बाहेर जाऊन पाहतील; कारण त्यांना लागलेली कीड कधी मरायची नाही; त्यांना लागलेला अग्नी कधी विझायचा नाही; सर्व मानवजातीस त्यांची किळस येईल.”
यशया 66 वाचा
ऐका यशया 66
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 66:19-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ