YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 63:7-9

यशया 63:7-9 MARVBSI

परमेश्वराने आमच्यावर जे सर्व उपकार केले आणि आपल्या दयेने व आपल्या विपुल करुणेने इस्राएलाच्या घराण्याचे जे फार कल्याण केले, त्यांस अनुसरून असे परमेश्वराच्या सदय कृत्यांचे मी वर्णन करीन, त्याचे गुणानुवाद गाईन. कारण तो म्हणाला, खरोखर हे माझे लोक आहेत, कधीही लबाडी करणार नाहीत अशी ही मुले आहेत; म्हणून तो त्यांचा त्राता झाला. त्यांच्या सर्व दु:खाने तो दु:खी झाला, त्याची प्रत्यक्षता दर्शवणार्‍या दिव्यदूताने त्यांचे तारण केले; त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यांना उद्धरले; पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालनपालन केले.