तू स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या पवित्रतेच्या व प्रतापाच्या निवासस्थानातून पाहा; तुझी आस्था व तुझे पराक्रम कोठे आहेत? तुझ्या पोटातला कळवळा व तुझी करुणा माझ्या बाबतीत संकुचित झाली आहे. तरी तू आमचा पिता आहेस; अब्राहाम आम्हांला जाणत नाही; इस्राएल आम्हांला ओळखत नाही, तरी हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आमचा त्राता हे तुझे प्राचीन काळापासून नाम आहे. हे परमेश्वरा, आम्हांला तुझ्या ह्या मार्गातून का बहकू देतोस? आम्ही तुझे भय बाळगू नये इतकी आमची मने कठोर का करतोस? तुझे सेवक, तुझे वतन झालेले वंश ह्याच्याकरिता परत ये. तुझ्या पवित्र लोकांनी केवळ थोडा काळ वतन भोगले; आमच्या शत्रूंनी तुझे पवित्रस्थान तुडवून टाकले आहे. ज्यांच्यावर तू कधी राज्य केले नाहीस, ज्यांना तुझे नाम दिले नाही, त्यांच्यासारखे आम्ही झालो आहोत.
यशया 63 वाचा
ऐका यशया 63
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 63:15-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ